कालच का नाही वाचल्या ह्या म्हणी... एवढीच मनापासून आलेली भावना!!
२ दिवसात काही म्हणी वापरायची संधी गमावलीत का?...
हा हा हा... अहो गाडीची किल्ली मिळाली तरी चालविण्याची अक्कल पाहिजे ना? तसा अकलेचा (की साहित्यिक प्रतिभेचा) खंदकच आहे आमच्याकडे... म्हणून केवळ इतरांच्या भराऱ्या पाहून टाळ्या पिटायच्या!!
लोभ तर आहेच वृद्धीची अपेक्षा अन् आवश्यकताही आहे - एकलव्य.
(अवांतर - पत्रशेवट हा माझ्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणण्यात सिंहाचा वाटा असलेल्या एका गुरुदेवांचा आहे. कलोअ वरून लिहावेसे वाटले!)