भाषेत सहजपणा असला पाहिजे असं  मला वाटतं. कितीही औपचारिकपणा आणला, तरी ती नैसर्गिक वाटली पाहिजे, नाहितर ती भाषा आपल्यालाच परकी वाटू लागते आणि आपण हळुहळू भाषाच सोडून देतो. पुण्या मुंबईत आज ह्याचेच पडसाद दिसतात. अशा उगाचच्या औपचारिकतेमुळे, इंग्रजी माध्यमाच्या हट्टामुळे आणि "शुद्ध" मराठी न बोलता येण्याच्या अडचणीमुळे आज जास्तकरून लोक इंग्रजीच वापरताना दिसतात. ह्यात इंग्रजी माध्यम आजच्य जगात जरी अपरिहार्य मानलं, तरी भाषेचा सहजपणा ठेऊन आणि "अशुद्ध" मराठी बोलणाऱ्यांना इतरांइतकाच मान देऊन आपण आपलं आयुष्य अधिक समृद्ध करू शकतो.

शिवाय रटाळपणा जावा म्हणून एक छानसा किस्सा जोडला होता की!