(पाणि) संस्कृतात ऱ्हस्वच हवे. मराठीत म्हणून मी दीर्घ (पाणी) लिहिले. यावर बरीच चर्चा मनोगतावर झालेली आहे, तेव्हा मी माझी भर घालत नाही. मला स्वतःला हे शुद्धलेखनाचे (नवे) नियम फारसे पसंत नसले तरी आता ते पाळावेच लागतात असे वाटते.
शंकराला पिनाकपाणी ही म्हणतात (हे मी विसरलोच होतो).
शार्ङ्ग हे धनुष्यच असावे, कारण विष्णूच्या शंखाचे नाव पांचजन्य होते. शार्ङ्गरव असेही विष्णूचे आणखी एक नाव आहे. रव = आवाज, म्हणजे त्या धनुष्याचा टणत्कार खूपच जोरदार असावा. (गोरेगावच्या एका हौ. सोसायटीचे नाव "पगरव" आहे त्याची या निमित्ताने आठवण आली.)
(शार्ङ्गधर चा अपभ्रंश होऊन) सारंगधर असे आडनाव महाराष्ट्रीय लोकांत असते असे ऐकले आहे.