श्री.खिरें,
माझ्या विनंतीला मान देऊन आपण त्वरित लिहायला घेतले याने मनस्वी आनंद झाला. वर्णनाची सुरुवात छानच झाली आहे. हात आखडता घेऊ नका. सर्व सविस्तर लिहा. (श्री. सर्वसाक्षी यांची चीनमधल्या अनुभवांची वर्णने जरूर वाचा.)
पू डाँग ह्या शांघाईच्या झगमगीत भागांत शिरल्यावर कमाल वाटली, एखाद्या प्रगत देशाच्या शहरात जर भारतातल्या मोटरसायकली, स्कूटरी आणि परदेशातल्या गाड्या टाकल्या तर कसं दिसेल, तसं वाटलं. रस्ते बिस्ते एकदम प्रशस्त पण वहानं अगदी भारतासारखी. त्यातून सर्व टोलेजंग इमारती काही केल्या मनात बसत नव्हत्या. सर्व इमारतींत काहितरी चुकलय असं वाटत होतं.
हे आपले वर्णन खूप आवडले.
कलोअ,
सुभाष