महाकोशाची महाबोंब वाचून वाईट वाटले. माझ्यापरीने शक्य आहे ते करीन.
विश्वस्थांनी अथवा इतर प्रशासकांनी कोणास महाकोशाला योगदान करावयाचे असल्यास काही सुलभ मार्ग -- उदा. online -- उपलब्ध करून दिल्यास फरक पडेल.
तसेच कल्पकतेने हा उपक्रम राबविल्यास -- मराठी क्रिकेटपटूंचा मदत-सामना, चित्रपटकलाकार, मदतीसाठी नाटकांचे प्रयोग, एन आर आय स्त्रोत, ... -- महाकोश उभा राहणे अशक्य तर सोडाच पण फारसे अवघडही वाटत नाही.