योगेशराव तुमच्याबद्दल खूप सहानुभूती वाटते हो. तुमचा विषय काय आणि हे सगळे पशुपक्षी काय बोलत आहेत. पण काय करणार आम्हीही त्यातलेच. जित्याची खोड...

तुम्ही एक करा. सगळी नावे टिपून ठेवा आणि त्यांच्या प्रस्तावांनाही असेच फाटे फोडत न्या आणि परतफेड करा. एखाद्या सामाजिक विषयावरील प्रतिसादात (पु. ल. ना स्मरून) 'बाजरीवऱील कीड' यासंबंधी लिहा. भाषेसंबंधी चर्चेत 'महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादा'वर लिहा, भारतीय संस्कृतीवरील चर्चेत 'क्लिंटनची आणि शेन वॉर्नची संस्कृती' यावर लिहा. जमले नाही तर आम्हाला सांगा, आम्ही मदत करू (च्यायला आम्हालाही चान्स.).

-विचक्षण