फॅशनेबल, शोभिवंत, हट-के नाव ठेवण्याच्या अट्टहासापायी लोक अपत्याला काहीच्या काही नावे देतात, ठेवतात. मित्राच्या परिचयातल्या एका दांपत्याने आपल्या मुलीचे नाव रुदाली  ठेवले तेव्हा हसावे की रडावे असा प्रश्न पडला होता.

जुन्या काळात लोक विष्णुसहस्त्रनामातून नाव निवडायचे असे दिसते. अनंत, गोविंद, श्रीधर, रंगनाथ, हरी, वामन अशी नावे बहुधा वैष्णवांना प्रिय असावीत. मला अशी पारंपरिक नावे आवडतात. चित्तरंजन हे नावही विष्णुसहस्त्रनामांपैकी असावे असे वाटते.


चित्तरंजन