ज्ञानदेवी चाइल्ड लाइनच्या संचालिका डॉ. अनुराधा सहस्रबुद्धे म्हणाल्या, ""निर्णयाच्या अंमलबजावणीपूर्वीच अनेक पळवाटा काढल्या जातात. त्यामुळे या निर्णयाला घातक ठरू शकणाऱ्या पळवाटा कोणत्या, हे शोधले गेले पाहिजे. त्यातून कायद्यामागील संकल्पना स्पष्ट होऊन बालमजुरीला पूर्णपणे आळा बसेल. परिणामी मुलांचे शाळेत जाण्याचे प्रमाण वाढेल.''