हि बरीच जुनी व बऱ्याच जणांना माहीत असणारी गोष्ट उदाहरण म्हणून देतो 

एकदा एका राज्याचा आवडता पोपट मेला..
राज्याला बातमी कशी व कोण सांगणार?
जो पोपट मेला हे सांगणार, त्याचा र्मुत्यु निश्चित होता..
तेंव्हा 'महाराज, तुमचा पोपट मेला' हे सांगण्यापेक्षा, प्रधानाने खालील प्रमाणे सांगितले..

प्रधानः महाराज, तुमचा पोपट..
महाराजः काय झालं?
प्रधानः महाराज, तुमचा पोपट काही खात नाही..
महाराजः त्याला जे आवडेल ते खाण्यास दया.
प्रधानः महाराज, तुमचा पोपट काही बोलत नाही
महाराजः त्याच्या मनोरंजनाची व्यवस्था करा..
प्रधानः महाराज, तुमचा पोपट नुसता पडून आहे.
महाराजः ठीक आहे, झोपला असेल.. आम्ही थोड्यावळाने जाऊन समक्ष पाहू..

थोड्या वेळाने महाराज जाऊन पाहतात तेंव्हा त्यांना कळते, पोपट मेला आहे..