आजीची आठवण झाली. माझ्या आजीच्या ४-५ वाक्यात एखादी तरी म्हण असायचीच. आम्हा नातवंडाच्या काही पाठही झाल्या होत्या. आजीने एखादी म्हण सुरु केली की आम्ही मुले ती म्हण आजीच्या आधी पूर्ण करुन जोरजोरात हसायचो आणि आमची आजी अशी लाजायची की बस्स!!!