सर्वात आधी विचारप्रवर्तक प्रश्नाबद्दल आणि उत्तराच्या पर्यांयांची चांगली मांडणी केल्याबद्दल अभिनंदन!

उत्तर १ - अ, ब, क, ड ह्या सर्व पर्यायांना विडंबन म्हणता येऊ शकेल, पण त्यापैकी ब आणि क ही वरच्या दर्जाची म्हणावी लागतील.

उत्तर २ - अ आणि ब. मूळ कवितेत कवी काय काय करू शकतो याचे (थोडेसे अतिरंजित) वर्णन आहे. पण सगळेच कवी असे नसतात काही नुसते गल्लाभरू, आव आणणारेही असतात. अत्र्यांनी या प्रवृत्तीचे वास्तव जगासमोर आणले आहे असे वाटते.