माझ्या चंदनी देहाचा
मंत्र झिजणे झिजणे
उणे लिंपायला माझे
घाली सुगंधाचे लेणे
झीज केशरी तयाची
तप्त जीवा लावी ऊटी
*********
*********
===================
वात्सल्यसिंधु आई - माधव ज्युलियन (?)
प्रेमस्वरूप आई,
वात्सल्यसिंधु आई,
बोलावू तुज अता मी,
कोणत्या उपायी?
=====================
माझी आई - साने गुरूजी
आई माझा गुरू,
आई कल्पतरू,
सुखाचा सागरू,
आई माझी.
======================
मायभू आई
गे मायभू तुझे मी,
फेडीन पांग सारे,
आणिन आरतीला.
हे सूर्य-चंद्र-तारे!
========================
सुजलाम आई
सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम शस्य शामलाम मातरम वन्दे!
==================
देवीरूपी आई
या देवी सर्व भुतेषु मातृरुपेण संस्थिता,
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः
===================