वा वा वा! विक्षिप्त महाशय,
अत्यंत परखड आणि तितकीच दर्जेदार गज़ल.
अद्याप गाठ नाही, विष्णू, तुझ्या शिखेला
अद्याप नंद आहे सत्तेत मातलेला
वा. ऐतिहासिक संदर्भ खूप छान रीतीने आला आहे.
गर्तेत तक्षशीला मिसळून पार गेली
इतके तरी कुणी का सांगाल शारदेला?
तक्षशीलेची शारदेशी घातलेली सांगड आवडली.
स्वारी करून जावो तैमूर वा सिकंदर
नाठाळ देश माझा कलहात दंगलेला
आई आई ग. पुन्हा ऐतिहासिक संदर्भ बोचून जातात. अगदी वास्तवाला धरून.
परजून शस्त्र शत्रू चालून येत असता
उपवास, मौन यांचा जप येथ चाललेला
अप्रतिम. ह्या ऐतिहासिक संदर्भाबद्दल बोलावयाला मनोगतावर बंदी आहे नाहीतर ह्या शेराबद्दल कितीही लिहिले तरी कमीच पडेल.
तलवार म्यान केली दुबळ्या अहिंसकांनी
का क्लैब्यधर्म आम्ही हा अंगिकारलेला
अप्रतिम. ह्या ऐतिहासिक संदर्भाबद्दल बोलावयाला मनोगतावर बंदी आहे नाहीतर ह्या शेराबद्दल कितीही लिहिले तरी कमीच पडेल.
इतिहास वाचण्याची फुरसद इथे कुणाला
सांधायचा कसा हा वाडा दुभंगलेला
वा वा. वाडा दुभंगलेला! अप्रतिम. ह्याही ऐतिहासिक संदर्भाबद्दल बोलावयाला मनोगतावर बंदी आहे नाहीतर ह्या शेराबद्दल कितीही लिहिले तरी कमीच पडेल.
आपल्या प्रतिभेस आणि राष्ट्रप्रेमास सादर अभिवादन!
आपला
(नतमस्तक) प्रवासी