मराठी साहित्य संमेलन हे मराठी साहित्याची आवड आणि त्यांत विशेष रस असलेल्या व्यक्तींकरता असते

मराठी मातृभाषा आणि मराठी भाषेची जोपासना करणे हा मराठी साहित्य परिषदेचा उद्देश वाटत नाही.  ते वार्षिक संमेलने भरवितात ते एकमेकांची पाठ थोपटून घेण्यासाठी.  स.मेलनाध्यक्ष कोण, कोठे ते भरवायचे, त्या गावात धनिष्ठ कोण, राजकारणी (मंत्री) कोण, कोणावर टीका करता येईल अशा मुद्द्यांना प्राधान्य असते.  फार तर मराठी भाषेची आबाळ, कुठल्या तरी इयत्तेतला कोणता उतारा हा अयोग्य आहे वगैरे विषयांवर थातूर मातुर परिसंवाद घडविला की झाले.

मराठीची जोपासना ही घराघरातून होते, सभासंमेलनाने नव्हे.  तुम्ही तुमच्या घरातल्या व्यक्तींशी, मित्रमंडळात, कामाच्या ठिकाणी, सामाजिक ठिकाणी मराठीचा पाठपुरावा करावा.  ते मराठी भाषिकाचे कर्तव्य आहे.

सभासंमेलनाला पैसे पुरवणे, महाकोशाला मदत करणे हे ऐच्छीक आहे.  ते सर्वसकट जनतेचे कर्तव्य नाही.

कलोअ,
सुभाष