विकीपीडिया सारखे प्रकल्प हे लोकांचे, लोकांनी लोकांसाठी चालवलेले उपक्रम आहेत. याचा कोणी एक मालक किंवा प्रशासक नाही. सर्वांच्या योगदानातून एक मुक्त (सर्वांना विनामूल्य उपलब्ध असलेला) ज्ञानकोष तयार करणे हा विकीपीडियाचे उद्देश्य आहे.
पण हा उपक्रम काही आदर्श जगात चालत नाही. जिथे इतके लोक संलग्न आहेत तिथे समाजातील सगळ्या प्रवृत्ती दिसणारच. काही चुका अजाणता होतात काही जाणूनबुजून केल्या जातात. सर्वच लोक प्रगल्भ आणि निरपेक्ष/निस्वार्थी असत नाहीत (हे मनोगतावरही पाहू शकतो)
हे सर्वच सामाजिक उपक्रमांना लागू आहे. आपल्या लोकशाहीचेच उदाहरण घ्या. कोणतीही संकल्पना ती प्रत्यक्षात आणणाऱ्या लोकांइतकीच चांगली असते. केवळ दोषच बघायचे झाल्यास असंख्य मिळतील. असो.