हा उपक्रम काही आदर्श जगात चालत नाही. जिथे इतके लोक संलग्न आहेत तिथे समाजातील सगळ्या प्रवृत्ती दिसणारच. काही चुका अजाणता होतात काही जाणूनबुजून केल्या जातात.
सहमत.
एक मुक्त (सर्वांना विनामूल्य उपलब्ध असलेला) ज्ञानकोष तयार करणे हा विकीपीडियाचे उद्देश्य आहे.
सहमत.
सर्वच लोक प्रगल्भ आणि निरपेक्ष/निस्वार्थी असत नाहीत (हे मनोगतावरही पाहू शकतो)
उदाहरण पटले नाही. मनोगत आणि ज्ञानकोष एका तागडीत तोलता येत नाहीत. ज्ञानकोषाचा उपयोग परिपूर्णते साठी केला जातो. तो विकीच्या स्वरुपामुळे साध्य होत नाही (विकीचे कार्य ज्या तत्वावर चालते त्यामुळे तो परिपूर्ण होण्याची शक्यता नाकारता येत नाही परंतु सद्यस्थितीत छातीठोकपणे वापरण्यासाठी विकी उपयुक्त नाही)
जी गोष्ट आपल्याला खोटी पाडू शकते तिला पडताळून घेणे उत्तम. उदा. गोळ्यांची कुसुमाग्रजांच्या नावावर खपवलेली कविता.
कुठेतरी याला निर्बंध घालता येतिल का हे जाणून घेण्यात रस आहे.