विकि मधले लेख आणि माहिती कोणीही बदलू शकतो हे माहीत होते. पण माझी शंका होती ती विकिच्या गाभ्याविषयी. जसे की आपण लेख/माहिती बदलू शकत असलो तरी, ले आऊट (मराठी?), रंगसंगती अशा गोष्टी बदलू शकत नाही. मला मराठी विकिच्या मुख्य पानावर (आणि इतर सर्व पानांवरही) टंकलेखनाची चूक दिसली (जी अर्थातच अजाणता झालेली आहे) मी ही चूक इच्छा असूनही सुधारू शकत नाही.. त्यासाठी असे कोणीतरी की ज्याला विकिच्या पानावरील HTML मध्ये बदल करून तो सेव्ह करण्याचा अधिकार आहे. माझी शंका - हा अधिकार कुणाला असतो?
विकिच्या विश्वासहर्तेविषयी - माझ्या मते हे बरेचसे अवलंबून आहे तुम्ही विकिवरिल माहिती कशासाठी वापरता आहात ह्यावर. मी बऱ्याचदा विकि वापरतो अशा गोष्टींचा शोध घेण्यासाठी ज्यांचे मला फक्त कुतूहल आहे.
उदा. चीन मधील प्रेक्षणीय स्थळे कोणती? --- ह्यावर माहिती मिळवण्यासाठी मला पूर्वी हा शोध गुगल वर घ्यावा लागे व त्यांतून हजारो विस्कळीत/असंबद्ध दुवे मिळत असतं ज्यावर हवी ती माहिती शोधणे खूप कठीण होते. आता विकिमुळे हीच माहिती मिळवणे अत्यंत सोपे झाले आहे.
आता हाच शोध मी प्रत्यक्ष चीन ला जाण्यासाठी करत असेन तर ही माहिती एकदा इतर संकेतस्थळांकडून पडताळून घेतले (उदा. चीन सरकारचे अधिकृत पर्यटन स्थळ) की झाले
इतकी सुविधा आणि तीही विनामूल्य, जाहिरातींच्या जाचा शिवाय उपलब्ध केल्या बद्दल मी तरी विकिचे आभारच मानतो.
--------------------------------------------------------------
विकि का विकी?