गोष्ट (की लेख?) वाचून लहानपणी पुस्तकात असलेली सांगकाम्या ही गोष्ट आठवली.त्यातील मुलगा हा रघूचाच अवतार असतो.आईचा उपदेश तो असाच
उशीरा अमलात आणतो‌. सर्व गोष्ट सांगत नाही फ़क्त एक नमुना देत आहे.त्या मुलाला तो मामाकडे गेल्यावर मामा एक कुत्र्याचे पिल्लू देतो तर तो ते डोक्यावर घेऊन घरी येतो .आई म्हणते अरे अशी वस्तू दिली तर डोक्यावर न ठेवता त्याच्या गळ्यात दोरी बांधून आणावी  दुसऱ्यावेळी मामा जिलबी देतो तर हा पठ्ठ्या तिला दोरी बांधून ती रस्त्यातून ओढत आणतो वगैरे वगैरे!