त्यासाठी असे कोणीतरी की ज्याला विकिच्या पानावरील HTML मध्ये बदल करून तो सेव्ह करण्याचा अधिकार आहे. माझी शंका - हा अधिकार कुणाला असतो?

मराठी विकि. चे सध्या जे संचालक आहेत त्यांच्या वैयक्तिक चर्चा पानावर निरोप ठेवा. ते या बाबतीत सुधारणा करू शकतील.

आणि लोकांच्या अश्या चुका दुरूस्त कराण्याशिवाय आम्हाला दुसरे धंदे नाहीत की काय? आणि लोकांच्या चूका आम्ही का म्हणून दुरुस्त कराव्यात?

तात्या, चुका आहेत हे तर निश्चितच पण विकिसारख्या प्रकल्पात चुकांची संख्या ही संपादकांच्या संख्येच्या व्यस्त प्रमाणात असते.मराठी विकि. अजून बाल्यावस्थेत आहे. संपादकांची संख्या खूपच कमी आहे. (याला माझ्या मते मुख्या कारण म्हणजे मराठी टंकित करण्या साठी विकि. कडे मनोगत सारखा interface नाही).

असो. Nature या प्रसिद्ध शास्त्रीय नियतकालिकाने इंग्रजी विकी आणी एनसायक्लोपीडीया ब्रिटॅनिका यांतील अनेक महत्त्वच्या शास्त्रीय संदर्भांच्या विषयीच्या माहीतीची तूलना केली होती. त्यात असे आढळले की जवळ जवळ सर्व बाबतीत विकि. आणि ए.ब्रि. तुल्यबळ आहेत. अधिक माहिती साठी हा दुवा पाहणे. तात्पर्य असे की आपल्या सारख्या प्रत्येकाने स्वतः ला रुची असलेल्या विषयांचे संपादन केले तर चुका कमी होतील. मतभेद सोडवण्यासाठी, संदर्भ देण्यासाठी वगैरे इंग्रजी विकि. मध्ये Talk pages चा वापर फार चांगला केला आहे. मराठी विकि. ला अजून बरीच मजल गाठायची आहे.

आणि उद्या समजा आम्ही अशी एखादी चूक दुरूस्त केलीच, पण परवा अजून तिसरा कुणी येऊन त्याच्यावर आणखी काहीतरी लिहून ठेवणार नाही हे कशावरून?

संपादन इतिहास साठवलेला असतो. त्यामुळे कुणी वायफळ बदल केले तरी तुम्ही तुमच्या संपादना नंतरच्या आवृत्तीला परत एका क्लिक मध्ये जाऊ शकता.

मग जळ्ळं एन्सायक्लोपिडिया म्हणून विकीचं काय महत्व राहीलं?

पारंपारिक ज्ञानकोषां सारखा हा कोष नाही हे खर आहे. पण जसं "futures market" मध्ये जितके जास्त लोक bet  करतात तितकी अचुकता वाढते तसेच इथेही आहे असं मला वाटत. मला वाटत विकीच महत्त्व हे त्याच्या जागतिक उपलब्धते मध्ये आहे. विशेषतः इंग्रजी विकि. मधली माहिती सामान्यतः बरोबर असते. (ही स्थिती येण्यासाठी इं. वि. ला अनेक संपादकांचा हातभार लागला आहे. तपशीलाच्या चुका असू शकतात आणि त्या विकतच्या कोषांमध्ये सुद्धा असतात.

ज्यांनी डोळ्यात तेल घातलंय, ते पुढाऱ्याच्या भाषणापासून अग्रलेख, एन्साय्क्लोपीडिया आणि गीता-कुराणापर्यंत सगळंच तपासून बघतील

१०० % सहमत आहे. अभ्यासू चिकित्सकाला माहिती स्रोतांची वानवा नाही.