कुशाग्र व मिलिंद प्रतिसादाखातर धन्यवाद!
कुशाग्र, तुमची ऊर्मी (खुमखुमी) च तुम्हाला मूळ विडंबन कवितेकडे आणि आता उत्तरांकडे घेऊन आलेली आहे. तेच कारण आहे ज्यामुळे तुम्ही उत्तराधिकारी झालात.
मिलिंदराव, कुणाला ओढून आणून माझ्या प्रश्नांची उत्तरे द्या असे म्हणणे सयुक्तिक नाही. म्हणून व्यनिद्वारे उत्तरे मागविलेली नाहीत. उत्तराधिकाऱ्यांनी मूळ विडंबन कवितेस दिलेले प्रतिसाद त्यांची रुची दर्शवितात. त्यांची रुची निरंतर असेल तर ते प्रश्नोत्तरेही आवर्जून देतील. तुम्ही आधीच्या प्रश्नांना उत्तरे दिली होतीत. इथेही अवश्य द्या!
इतरही लोक प्रतिसाद/उत्तरे देतील. द्यावेत. त्यात वावगे ते काय आहे?
तुम्हीही रुची राखू शकता. उत्तराधिकारी होवू शकता. न होता उत्तरेही देऊ शकता. यापैकी काय करायचे हे पूर्णतः तुमच्यावरच सोपवलेले आहे. इतरांनी उत्तरे देऊ नयेत. किंवा आताही मूळ विडंबनावर प्रतिसाद देऊ नये असे मी कुठेही म्हटलेले नाही. तुमच्या प्रतिसादानेच तुमची रुची सिद्ध झालेली आहे. एरव्ही रुचिहीन लोकांनी विनाकारण असंबद्ध प्रतिसाद दिल्याने लाभ तो काय होणार? नाही का?
तुम्ही याचेशी सहमत नसाल, आणि तुमचा आणखीही काही वेगळा दृष्टिकोन असेल तर अवश्य समजू द्या! स्वागतच होईल.