तुमची बाग खूप आवडली. छान आहे.

बागेवरुन मला माझ्या लहानपणची बाग आठवली. त्या बागेमध्ये गुलाबाची झाडे होती. रोज सकाळी मी माझ्या शाळेतल्या बाईंना गुलाब घेऊन जायचे. जाईचा मोठा वेल होता. त्याला प्रचंड फुले यायची, इतकी की सगळ्यांना मोठे गजरे होऊन अंगणात त्यांचा सडा पडायचा. रोज संध्याकाळी स्टुलावर उभे राहून जाईच्या कळ्या काढण्याचा कार्यक्रम असायचा. अर्धवट उमललेल्या कळ्यांचे गजरे खूपच गोड दिसायचे. एक पेरूचे झाड होते. जास्वंद, अबोली, कोऱ्हांटी, गुलबक्षी होती. पूजेला घरचीच फुले. बाबा रोज सकाळी परडीत फुले घेऊन यायचे. हिवाळ्यात रोज सकाळी वाळलेल्या पानांची एक छोटीशी शेकोटी पेटायची. गौरी गणपतीत खड्यांच्या गौरी आम्ही याच बागेत जाऊन आणायचो. शिवाय केळी व सीडलेस पपई पण होती.

अमेरिकेत कोथिंबीरीच्या बाबतीत मात्र टेक्साज, डेंटन ला १ डॉलर ला ५ मोठ्या जुड्या यायच्या, त्यामुळे बरेच वेळा भजी केली होती.