छान आहे लेख. शीर्षकही समर्पक.
सुरुवातीला थोडीशी पार्श्वभूमी, मग आलेल्या अडचणी आणि नंतर शोधलेला तोडगा असा logical प्रवास दिसतो लेखामध्ये.
आणि विशेष म्हणजे शेवटचे वाक्य - देश कोणताही असो, माती सगळीकडे सारखीच. बी पेरलं की रोपटं उगवणारच. पु. लं. ची आठवण झाली... त्यांच्या लेखांचे शेवट सुद्धा लिखाणाला अगदी असेच एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतात.