सुभाषराव,
शशांक यांनी नाशिक साहित्यसंमेलनाचा जो दुवा दिला आहे, त्यामध्ये साहित्य संमेलन म्हणजे ;
- संमेलन म्हणजे अवघ्या मराठी माणसांची अस्मिता
- मराठी समाजाच्या जीवन जाणिवांचा वेचक आणि वेधक शोध
- मराठी समाज आणि संस्कृती यांच्या अंतर्मनाचे सम्यक दर्शन
- मराठी माणसांच्या मनोमीलनाची जागा
- संमेलन तुमचे, आमचे, सर्वांचे, अवघ्या मराठी बहुजनांचे आहे.
असे म्हणले आहे.
इथवर चाललेल्या चर्चेतून असे दिसते की मराठी साहित्यसंमेलन हे मराठी माणसापासूनच दूर जात आहे. सामान्य मराठी माणसाला संमेलन त्याच स्वतःचं वाटतच नाही. त्यात भाग घ्यावासा वाटत नाही. ही संमेलने म्हणजे राजकारण्यांचा आखाडा बनला आहे.
तुम्ही म्हणता त्याप्रमाणे मराठी मातृभाषा आणि मराठी भाषेची जोपासना करणे हा मराठी साहित्य परिषदेचा उद्देश वाटत नाही, अस असेल तर अशा पद्धतीने संमेलने भरविण्याची गरजच काय?
मराठी माणूस व मराठी साहित्य संमेलन ह्यांच्यातील दरी कमी होणारच नाही असं दिसतंय खरं.
मराठीची जोपासना ही घराघरातून होते, सभासंमेलनाने नव्हे. तुम्ही तुमच्या घरातल्या व्यक्तींशी, मित्रमंडळात, कामाच्या ठिकाणी, सामाजिक ठिकाणी मराठीचा पाठपुरावा करावा. ते मराठी भाषिकाचे कर्तव्य आहे.
हे तुमचं म्हणणं एकदम खरं आहे सुभाषराव!
राहुल