मी तज्ञ नाही. तसेच विकीपीडीयावर कोणीही लिहावे अशी जी पद्धत आहे तीही मला मान्य नाही

मग या लेखांविषयीचं मत मनोगत वर कसं काय मांडताय. मनोगत पण public domain मध्ये आहे. तुम्ही कोणत्या लेखावर टिप्प्णी करताय त्याचा दुवा वर आहे. मग यात आणी हेच विकिपीडिया वर मांडण्यात फरक तो काय उरला? दोन्ही कडची माहिती कोणालाही महाजालावर शोधता येते.

विकि. मध्ये सुद्धा मुख्य पानावर जर आपल्याला बदल करायचे नसतील तर त्या त्या लेखाच्या चर्चेच्या पानावर तुम्ही तुमचे हेच मुद्दे, आढळलेल्या चुका मांडू शकता. त्याचा पुढील संपादकांना उपयोग होऊ शकतो.

दुसरा मुद्दा असा की आपण इतिहासकार नसलात तरी कोणत्या ना कोणत्या बाबतीत तरी आपल्याला इतरांपेक्षा थोडी अधिक माहिती असेल? निदान त्या बाबतीत तरी तुम्ही सहभाग घेऊ शकता?

चार लोकांनी एकत्र येऊन माहिती गोळा करून सूत्रबद्ध पद्धतीने मांडण्याचे विकि. हे एक माध्यम आहे. चार टाळकी एकत्र आली तर बऱ्याचदा ती भल्याभल्या तज्ञांपेक्षा जास्त चांगली कामगिरी करू शकतात अस माझं वैयक्तिक मत आहे. (इंग्रजी विकि मध्ये ते काही अंशी दिसून पण आलं आहे).

असो विकि. बद्दल एवढा प्रचार करण्याचं प्रयोजन एवढच की ते एक collaborative learning tool  आहे असं मला वाटत. त्यात जितके जास्त लोक सहभागी होतील तितकं ते अधिक प्रभावी होईल. पटल तर घ्या नाही तर सोडा.