"भरभर ज़रा करा की!", डोळे 'हिचे' म्हणाले
एकेक श्वास माझा कणकेत दंगलेला
हातात लाटणे ती घेऊन आत येता
हनुमान, राम यांचा जप येथ चाललेला
आणीक तिंबण्याची फ़ुरसत इथे कुणाला!
सांधायचा कसा हा गोळा दुभंगलेला?... चित्र समोर आले! छान विडंबन!
मूळ गजल इतिहासावर, तर ही उपहासावर आधारित आहे.
मूळ गजलेत राष्ट्रीय व भावनिक तर प्रस्तुत गजलेत कौटुंबिक व भोजनिक समस्या आहेत.
मूळ गजल 'इतिहास आपण वाचत नाही किंवा त्यापासून काही शिकत नाही' असे मत व्यक्त करते, तर सदर गजल 'इतिहासाची पुनरावृत्ती होत असल्याचा' (घरोघरी मातीच्या चुली) दाखला देते!
मनोगतावर कशाचे विडंबन होईल सांगता येत नाही! हा.. हा... हा...!
... अजब