ह्या 'ऐतिहासिक' आणि 'परखड' गझलेवर माझे परखड मत
काही संदर्भ मला कळले नाहीत किंवा माझ्या मते चुकीचे असावेत.विष्णूचा आणि शिखेच्या गाठीचा संबंध कळला नाही. आर्य चाणक्याचा, कौटिल्याचा संबंध असावा असे मला आजवर वाटते. चूभूद्याघ्या.
शारदेचा शेर कळला नाही. तक्षशीलेत कौटिल्य शिकवायचा. गर्तेत मिसळून जाणे हे कळले नाही. गर्ता म्हणजे खड्डा, खळगा असा अर्थ आहे. त्यात मिसळून जाता येते काय? तुम्हाला गर्द म्हणजे काळोखात वगैरे म्हणायचे होते काय? चूभूद्याघ्या.
नाठाळचा अर्थ वाईट, खराब, दुष्ट, लबाड, अडेल, द्वाड, त्रासदायक, खोडसाळ असा आहे. तो शब्द इथे चपखल आहे काय?चूभूद्याघ्या.
क्लैब्य क्लिष्ट आहे. तसेच, तर्ककठोरपणे विचार केल्यास मुळात अहिंसकांनी तलवारच बाळगायला नको. चूभूद्याघ्या.
देश, आमची संस्कृती वाडा आहे हे जरा फारसे चिरेबंदी वाटले नाही. वाडा दुभंगलेला ऐवजी सांधा दुभंगलेला वाचले. :)
चूभूद्याघ्या.
बाकी शेर भाषणातल्या टाळ्या-घेऊ वाक्यांसारखे असले तरी गझल छान, थेट आहे.
चित्तरंजन