नरेंद्रपंत धन्यवाद, विष्णुगुप्त हे आर्य चाणक्याचे नाव मी पार विसरलोच की. विष्णुपंत माफ करा. विष्णू असा एकेरी उल्लेख झाल्याने हा गोंधळ. तरीच म्हटले भगवान विष्णूने का बरे नसलेल्या शिखेला गाठ बांधावी? कौटिल्य, चाणक्य वृत्तात बसला नसावा.
क्लीबपासून क्लैब्य. म्हणजे नपुंसकत्व, भीरुता. सुदैवाने आधीच माहीत होते. फक्त वांझोटा, षंढ, भ्याड सारखा शब्द तिथे बसला असता तर उत्तम झाले असते असे म्हणायचे होते.
आडमुठा अर्थ घेतला तरी (मी वर अडेल अर्थ दिलेला आहे) आडमुठा, अडेल देश कलहात दंगलेला काही पटले नाही.
पण गर्तात मिसळून जाता येईल काय?