क्षमराठीची जोपासना ही घराघरातून होते, सभासंमेलनाने नव्हे.

असहमत.

असेच 'लॉजिक' सर्वत्र लावायचे ठरवले तर संगीत महोत्सव, चित्रपट महोत्सव, नृत्य महोत्सव यांबद्दलही असेच विधान करावे लागेल असे वाटते.

संशोधन करणारे अभियंते आणि शास्त्रज्ज्ञ आपापल्या प्रयोगशाळेत काम करतात. देशभरातले/जगातले असे अनेक शास्त्रज्ज्ञ येऊन सभा-संमेलने, चर्चा-परिसंवाद करतात. त्यातून प्रत्येक शास्त्रज्ज्ञाचा काहितरी फायदा होतो. तसेच विज्ञानाचीही प्रगती साधते.

शास्त्रज्ज्ञांना सभा-संमेलने, चर्चा-परिसंवाद भरवू नका सांगणे म्हणजे "विज्ञानाची प्रगती काय व्हायची ती प्रयोगशाळेत होते, सभा-संमेलनातून नाही." असे सांगण्यासारखेच आहे असे वाटते.

सभासंमेलनाने भाषेची प्रगती होतच नाही असे म्हणणे धाडसाचे ठरावे.

त्यामुळे, मराठीची जोपासना ही घराघरातून आणि सभासंमेलनातून होते असे वाटते.

तुम्ही तुमच्या घरातल्या व्यक्तींशी, मित्रमंडळात, कामाच्या ठिकाणी, सामाजिक ठिकाणी मराठीचा पाठपुरावा करावा. ते मराठी भाषिकाचे कर्तव्य आहे.

संपूर्णतः सहमत.

मराठी मातृभाषा आणि मराठी भाषेची जोपासना करणे हा मराठी साहित्य परिषदेचा उद्देश वाटत नाही. ते वार्षिक संमेलने भरवितात ते एकमेकांची पाठ थोपटून घेण्यासाठी. स.मेलनाध्यक्ष कोण, कोठे ते भरवायचे, त्या गावात धनिष्ठ कोण, राजकारणी (मंत्री) कोण, कोणावर टीका करता येईल अशा मुद्द्यांना प्राधान्य असते.

संमेलनाशी संलग्न असे गैरप्रकार निपटून काढले पाहिजेत याबद्दल सहमत.