तुम्ही अभियंते, शास्त्रज्ञ यांच्या संमेलनाने त्यांचा फायदा होतो असे म्हणालाच आहात. तोच तर माझा मुद्दा आहे. सामान्य शास्त्राच्या विद्यार्थ्याला किंवा शास्त्राबद्दल रस आणि आपुलकी बाळगणाऱ्या स्थराला त्या कॉन्फरन्सेसचा फायदा होतो का?
तुम्ही असा प्रश्न विचारणार हे माहित होते. त्याचे उत्तर खालीलप्रमाणे-
आज जगातल्या बहुतांशी पाठ्यक्रमात न्यूटनचे नियम, अणूरचना, बीजगणित, भूमिती, कॅल्कुलस इ. आढळतात. या सर्व गोष्टी ज्या-त्या शास्त्रज्ज्ञाच्या नोंदवहीतून 'डायरेक्ट' पाठ्यक्रमात उतरल्या असे वाटते का? ते संशोधन (प्रकाशित) झाल्यापासून अनेक सभा-संमेलने, चर्चा-परिसंवादातून मांडले-चर्चिले गेले. तावलून सुखालून निघाले आणि मगच प्रत्येक विद्यार्थ्याच्या पुस्तकात उतरले असे वाटत नाही का?
त्यामुळे त्या सर्व सभा-संमेलने, चर्चा-परिसंवादातून तात्कालिक विद्यार्थ्यांना काही फायदा झाला नाही हे मान्य केले. तरी आज तुम्ही-आम्ही-आपली मुलं जे शिकत आहेत हे त्याच सभा-संमेलनांचे फलित आहे असे वाटत नाही का?
दर पाच ते दहा वर्षांनी पाठ्यक्रम बदलला जातो त्यामागेही अशा सभा-संमेलनांचे अ/प्रत्यक्ष योगदान असते असे वाटत नाही का?