मोठे झाल्यावर आपल्या पैकी किती जण सार्वजनीक ध्वज्-वंदनाला गेलोय?
वयाच्या सहाव्या वर्षापासून आजपर्यंत फक्त एकाच वर्षी आजारपणामुळे जाऊ शकलो नाही. परदेशात असतानासुद्धा एकदाही १५ ऑगस्टचे ध्वजवंदन चुकवले नाही.
मुळात हे विचारा की, शेवटच्या कोणत्या वर्षी मी ध्वज्-वंदन केलय?
२००५.
हे संस्कार पालकांकडून होणे आवश्यक असते असे वाटते.
जॉन केनेडींच्या त्या प्रसिद्ध वाक्याचा दाखला देणे सोपे आहे. पण त्यासाठी "उर्ध्वमूल अधःशाख" असा वाढलेला जो भ्रष्टाचाराचा, अनितीचा विषवृक्ष आहे तो समूळ तोडून टाकला पाहिजे. ज्या देशात राष्ट्रध्वजाचा आणि राष्ट्रगीताचा अवमान करून कणभरही शिक्षा न होणारा मंत्री केंद्र सरकारात असतो त्या देशात जॉन केनेडींच्या त्या वाक्याला फक्त भिंतीवर मिरवण्यापेक्षा जास्ती महत्त्वाचे स्थान मिळेल असे वाटत नाही.