रावसाहेब,
हे फार होतय हो. एक तबकडी ती काय आणि त्यासाठी जाहिर आभार ते काय. तुम्हाला तलत आवडतो. मला आवडतो. माझ्याकडे होती, तुम्हाला हवी होती, ती दिली. काही विशेष केले नाही. तुम्हाला ती पाहून आनंद झाला यात आनंद आहे. मुळात जे माझे नव्हते पण माझ्याकडे होते ते कुणा चाहत्याला दिले यात ऋण कसले? तुम्ही तर पार लाजवून टाकले आहेत.