लेख / चर्चा प्रस्ताव आवडला. आपण विचारलेल्या काही प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न, आपण विचारले की,

तुम्ही चुकताय?....

समाज चुकतोय?

प्रदेश चुकतोय?

की राज्यकर्ते चुकताय?

- ऑल ऑफ़ द अबोव्ह..

राज्यकर्ते चुकताहेत कारण त्याशिवाय त्यांच्या पोळ्या भाजल्या जात नाहीत

प्रदेश (म्हणजे एका विशिष्ठ भागातील माणसे) चुकताहेत कारण प्रादेशिकता नको इतकी भिनली आहे.

समाज चुकतोय कारण सामाजीक सुस्तपणामुळे काही करायला नको आहे.

मी चुकतोय कारण काहीतरी सक्रिय हातभार लावायच्या ऐवजी इतरांच्या चुका शोधत किबोर्ड बडवत बसलोय....

कोण काय /कुठे / का /चुकतेय वगैरे बोलायच्या ऐवजी कोण खारीचा का होईना वाटा उचलून जे चुकतय ते सुधारण्याचा कसा प्रयत्न करतय त्यावर आणि आपण व्यक्तिगत आणि सामाजीक स्तरावर काय करू शकतो यावर बोलायचे का?