गझल सहज, छान आहे. आवडली.

मीच का आलो पुढे?
राहिला मागे जथा...

हा शेर वाचून यग़ाना चंगेज़ीचा हा फ़ारसी शेर आठवला -

सद रफ़ीक़ो सद हमदम, पर शिकस्ता वा दिल तंग
दावरा! नमी ज़ेबद बालो-पर बमन तनहा

भावार्थ:)
माझे एवढे दोस्त, सखे आहेत. पण सगळेच खचलेले, पराभूत, दुर्बल आणि कोमेजलेल्या हृदयाचे. मला एकट्यालाच पंख लाभले, उडण्याचे बळ  लाभले. परमेश्वरा! हे मला शोभत नाही. (१. हे मित्र शोभत नाहीत. ते मला कधी समजून घेणार २. हे असे एकट्याने उडावे हे मला शोभत नाही. त्यांनाही तू बळ दे)