आऊकडे घरासमोर मस्त अंगण आणि त्यात वड, पिंपळ आणि उंबर यांची त्रिपेडी वेणी आहे. त्याच्या अवतीभवती मस्त कट्टा केलेला जो रोज शेणाने सारवायचं काम असायचं. दुपारी कडक ऊन पडलं की या झाडांच्या थंडगार सावलीत खाट टाकून आऊ, तिच्या मैत्रिणी गप्पा मारायला बसायच्या आणि त्यांच्या आजूबाजूला आमचा लहानांचा कट्टा सजायचा.