प्रतिसाद देणाऱ्या सर्व मनोगतींचे मी आभार मानतो.
गर्तेत ही टंकलेखनात चूक झाली.त्याजागी गर्देत असे वाचावे. गर्द = धूळ, डस्ट.

नाठाळ ह्या शब्दाची निवड चुकली. शशांक ह्यांनी सुचवलेला नादान हा शब्द चपखल बसतो.

क्लैब्य हा शब्द गीतेतील 'क्लैब्यं मा स्म गमः पार्थ' ह्या कृष्णोक्तीवरून घेतला आहे.
'उपवासाचा जप' हा अर्थ अभिप्रेत नसून 'उपवास करण्याच्या धमकीचा जप' हा आहे. याबाबत अधिक खुलासेवार लिहिण्याची गरज आहे असे मला वाटत नाही.
इतर काही मुद्द्यांविषयी नरेंद्र गोळेंनी खुलासा केला आहेच.