धन्यवाद रोहिणी,
पुऱ्यांचे तंत्र मलाही पूर्णपणे जमले आहे असा मी दावा करीत नाही.
रव्याने पुऱ्यांना जरा कडकपणा येतो. किंचित साखर घातली तर कढईतून काढलेली, ट्टम्म फुगलेली पुरी लगेच 'बसत' नाही. ताटात वाढेपर्यंत फुगलेलीच राहते. खाणाऱ्याला मजा येते.
पुऱ्यांचे पीठ पोळ्यांपेक्षा घट्टसर भिजवावे. पीठ पातळ भिजले तर पुऱ्यांना फोड येतात त्या फुगत नाहीत. पुऱी काठाकाठाने लाटावी. काठ जरा पातळ आणि मधे जरा जाड असेल तर पुरी छान फुगते.
गॅस मध्यम आंचेवर ठेवावा. पुरी फुगल्यावर तिचे काठ तेलापासून वर उचलले जातात. अशा वेळी तिला सर्वबाजूंनी दाबून तापल्या तेलाशी तिचा स्पर्श होऊन पुरी नीट शिजेल.
तेल थंड असेल तर पुरी कच्ची राहील आणि जास्त तेल शोषेल, तेल जास्त गरम असेल तर पुरी शिजण्या आधी करपेल. म्हणून गॅस मध्यम आंचेवर असावा.