तात्या,
मलाही गुठळ्यावाला रस आवडतो. पण मुलायम, ठंड रसही तितकाच आवडतो.
आमच्या कोकणात रसात थोडीशी मिरपूड घालण्याची पद्धत आहे, म्हणजे रस अधिक चवदारही लागतो आणि बाधत नाही अशी श्रद्धा आहे.
ही श्रद्धा अंध नाही. मिरपूड, रस पचण्यास मदत करते.
आमरसात तुप, दुध वगैरे घालण्याची पद्धत आहे. आमरस तसा पचायला जड. तुपाने चवीत उजवेपणा येत असला तरी रसाचा जडपणा वाढतो. आमरस उष्ण असतो. म्हणून थंडाव्यासाठी दूध घालतात. पण, दूध घातलेला आमरस मला आवडत नाही.