'च्यामारी' सुद्धा म्हणायच नाही.

आता हे विचारा की मग त्याशिवाय जगायचे कसे.
फारच सोपे आहे.
निसर्गतः त्याशिवायच जगायचे असते.

मागे एकदा सरकारी कर्मचाऱ्यांचा संप होता. 'वर्क टु रूल!'
आता 'नियमाप्रमाणे काम करणे' म्हणजे जर संप होऊ शकत असेल तर
नक्कीच नियमांमध्ये काहीतरी गोची आहे असे होत नाही का?

तसेच 'निष्तेल, निष्तूप, निर्मीठ आणि निर्साखर' जगण्याबाबत आहे.
आपण ह्या केवळ मानवनिर्मित, कृत्रिम आणि अर्कस्वरूप आहारांना एवढे
सरावलो आहोत की तुम्ही 'मग जगायचे कसे?' हा प्रश्न सहज विचारलात.
तेव्हा हे स्पष्ट करायला हवे की हे पदार्थ नव्हते तेव्हाही जीवन समृद्ध होते.

चांगदेव चौदाशे वर्षे जगले असे म्हणतात.
जर 'निष्तेल, निष्तूप, निर्मीठ आणि निर्साखर' असे जगले
तर ते साध्य होऊ शकेल असे मला वाटू लागले आहे.