अजून काही शब्दांचा खेळ असलेले फालतू विनोद...

१>  एक जोडपं... पतीचं नाव अनंत...पत्नीचं अनुपमा... पतिराज बाजारात चाललेत... पत्नीला विचारतात "काय अनू?"...
तिचा प्रतिप्रश्न... "काय अंता?"

२>दारूच्या दुकाना बाहेर पाटीः "भव्य दारू सोडा योजना. आत चौकशी करा ". आत गेल्यावर कळतं - "दोन दारूच्या बाटल्यांवर एक सोड्याची बाटली मुफ्त. त्वरा करा"...

कोट्या झकास आहेत... अजून येऊ द्या.