मिलिंद, दुर्दैव तेच तर आहे.

अर्कस्वरूप पदार्थ केवळ जिभेचे चोचले पुरवतात. त्यांच्यामुळे आयुष्यरेखा घटते एवढेच नव्हे तर आयुष्याची गुणवत्ता घटते हेही वैद्यकीयदृष्ट्या सिद्ध झालेले आहे. हेच सांगण्याचा मी आटोकाट प्रयत्न इथे करत आहे.

एका मर्यादित अर्थानी, तुमच्या मताने जायचे तर

अंमली पदार्थांच्या सेवनाने स्वर्गात गेल्याचा आभास होतो म्हणून अंमली पदार्थांचा शौक करणाऱ्यांना आपण डोक्यावर बसवायला हवे का?

तंबाखूच्या सेवनाने दुःख, चिंता नाहिश्या होतात म्हणून अन्नाप्रमाणे तंबाखूचे सेवन वाढवत न्यावयास हवे. व क्रमप्राप्त घटलेले, अपंग जीवन खूप आस्वादायला हवे असे समजायचे का?

खरे तर आपण ज्याला आपले अन्न समजत आहोत ते आपले नैसर्गिक अन्न आहे का? हाच खरा कळीचा मुद्दा आहे.

नरभक्षक वाघ माणसे खातो. त्याचे कारण तो त्याचे नैसर्गिक भक्ष मिळविण्यास असमर्थ झालेला असतो हे आहे. मात्र त्याला माणूस हे त्याचे भक्ष नाही हे कळत असावे. निरोगी अवस्थेत तो माणसाकडे भक्ष म्हणुन पाहतही नाही.

आपण अर्करूप पदार्थांकडे भक्ष म्हणून पाहत आहोत, तर आपण निरोगी आहोत ना हे तपासून पाहायला हवे आहे. नव्या वैद्यकीय ज्ञानाचा आपण उपयोग करून घेणार आहोत की नाही?