कुसुमाग्रज :
सरणार कधि रण प्रभु तरी, हे कुठवर साहू घाव शिरी...
दिसू लागले अभ्र सभोती
विदीर्ण झाली जरी ही छाती
अजून जळते आंतरज्योती
कसा सावरू देह परी....
पावनखिंडीत पाउल रोवून
शरीर पिंजेतो केले रण
शरणागतिचा अखेर ये क्षण
बोलवशिल का आतां तरि...