आवराआवरीचा क्रॉनिक आजार ह्या प्रथम पुष्पाप्रमाणेच हे द्वितीय पुष्पही अतिशय खुमासदार.
फ्रीज...... हे एक स्वतंत्र विश्वच असते. ह्यात नवीन कोंभ फुटलेल्या भाज्यांपासून २ श्राद्ध उलटून गेलेल्या औषधाच्या गोळ्याही सापडतात.
नैवेद्याच्या वाट्यांमधून ठेवलेल्या एक-घास-भाज्या आणि एक-घास-वरणाचा गोळा जुन्या चाळकऱ्यांप्रमाणे सुखात नांदत असतात.
नारळाची वाटी करवंटीपासून सुटी करायची असेल तर फोडलेला नारळ ३-४ दिवस फ्रीजमध्ये ठेवावा हा मौल्यवान आणि महत्त्वाचा शोध मला आमच्या फ्रीज मध्येच लागला. असो.
अभिनंदन. असेच अजून काही लेख अपेक्षित आहेत.