अगदी मोजक्याच शब्दात एखाद्या कथानकाचाच आशय व्यक्त करणारी अष्टाक्षरी. मनाच्याही अंतर्मनात दडलेले भावनांच्या अवहेलनेचे;अपेक्षाभंगाचे दु:ख, चपखल प्रतिमामधुन  अतिशय प्रभावीपणे व्यक्त झाले आहे.'अबोलीच्या मुळी' ही, मनात खोलवर असलेले दु:ख सहसा व्यक्त न करणाऱ्या, अबोल, सोशिक असलेल्या स्वभावाचे रुपक म्हणुन छान आलीय.कुंद पावसाळी हवा, साचलेले पाणी, भिजलेली रात्र, पागोळी,ही रुपके, कवितेन वर्णन करण्यात आलेल्या भावावस्थेला अधिकच गडद करतात.
  अश्रुंच्या धुक्या‌आड
  काही पुसलेल्या ओळी,  आणि
  एक अस्पष्ट हुंदका
  आणि विझलेले नेत्र
-  ह्या ओळी ,अतिशय हळव्या, नाजुक मनाला झालेल्या वेदनेचीच साक्ष देतात

-मानस६