तात्यासाहेब तुमच्या तात्काळ, प्रामाणिक होकाराने मला हुरूप आला आहे.

मात्र, त्यामुळे ह्या मालिकेतील पूर्वीचे पंधरा भाग तुम्ही कदाचित वाचले नसावेत असे मला वाटू लागले आहे. वाचलेले नसतील तर अवश्य वाचा आणि ज्या अनेक प्रश्नांना आणि त्यांच्या उत्तरांना मी त्यांमध्ये अभिव्यक्त केलेले आहे त्या प्रश्नांना आज घडीला तुम्ही काय उत्तरे द्याल ते ते तिथे तिथे अवश्य लिहा.

ह्या प्रकरणात आपण केवळ आहारविषयकच प्रश्न पाहू या! काही मला पडलेले प्रश्न खाली देत आहे. मात्र हे प्रश्न अनेक असल्याने ते परस्पर प्रतिसादांद्वारेच प्रकट होणे इष्ट!

प्रश्न-१ आपले पूर्वज (आजोबा आजी आणि त्या आधीचे) रोजच्या आहारात सध्या आपण सेवन करतो त्यापेक्षा जास्त साजूक तूप खात होते का? जास्त साखर खात होते का?

प्रश्न-२ त्याकाळी आज माहीत असणारे अवनतीकारक रोग जसे की हृदयविकार, कर्करोग वगैरे अस्तित्वात नव्हते का?

प्रश्न-३ त्याकाळी जसे मुले होणे आणि स्त्रीपुरूष संबंध यांमध्ये नक्की कार्यकारणभाव काय ते सर्वश्रुत नव्हते, 'देवच मुले देतो' असा समज बहुजनसंमत होता; तद्वत हे अवनतीकारक रोग आणि आपले राहणीमान यांचातील अन्योन्य संबंधही प्रकाशात आलेला नव्हता का?

प्रश्न-४ साजुक तूपात किती टक्के कोलेस्टेरॉल असते?

तुम्हाला ह्या प्रश्नांची उतरे काय आहेत असे वाटते?