सर्वसाक्षी, निद्रापुराण छानच झालंय. मला पण केव्हाही कधीही झोप लागू शकते.  बाहेर निघाल्यावर जरा गार वारं लागलं की मी निद्रावस्थेत गेलीच.  म्हणून मी जेव्हा मुलांबरोबर एकटी (म्हणजे नवरा सोबत नसला की) भारतात जाणार असते तेव्हा नवऱ्याला फ़ारच काळजी वाटते. 

एकदा आम्ही भारतात सगळे यायला निघालो होतो.  एअरपोर्ट वर खूप उशीरा कळलं की फ़्लाईट कॅन्सल झालंय तेव्हा आम्हाला तिथेच एका हॉटेलमधे थांबवलं.  दुसऱ्या दिवशी रात्री पुन्हा तोच प्रॉब्लेम.  तिकीटांचा खूप गोंधळ होता. सगळे लोक अगदी अस्वस्थपणे फ़ेऱ्या घालत होते.  माझी मात्र त्या गार हवेत मस्त ब्रम्हानंदी टाळी लागली होती. नवरा इतका चिडाला होता ना. मी म्हटलं अहो तुम्ही आहात ना काळजी करायला सोबत मी सुद्धा काळजी करुन काही फ़रक पडणार आहे का? पण चक्क फ़रक पडला हो...... मी पुरी झोप न घेतल्यामुळे की काय पण आम्हाला आमची तिकिटं चक्क upgrade करुन मिळाली एक पैसाही जास्त न देता.  मस्तपैकी  first class मधे प्रवास झाला.....माझी उरलेली झोपही पूर्ण झाली.