नमस्कार ,

काही दिवसांपूर्वी मी विकीवर सक्रिय होतो. मनोगतावरील 'तो' याने विकी बद्दल माहिती व प्रेरणा दिली. त्या नंतर मी विकीवर होतो. आताशा तितका सक्रिय नाही. मात्र मला स्वतःला विकी प्रकल्प आवडतो. त्याच्या ज्या दोषांबद्दल आपण ओरडतो आहोत त्यांसहित सुद्धा विकी हा जगातील एक नावाजलेला विश्वकोश आहे.

विकीची इंग्रजी आवृत्ती ही लाखोंच्या संख़ेने लेख घेऊन आहे. मुक्त उपलब्ध आणि सहज साध्य असा हा विश्वकोश आहे. उगाच त्याला शिव्या देणे मला नाही पटत.

मी लिहिलेला लेख वरील यादीत पाहून बरं वाटलं.