तात्यांनी संतापून मला चार बोल सुनावले ही गोष्ट मी नेहमीची मानत नाही. निश्चितच त्यांच्या मूलभूत सांगीतिक श्रद्धांचा माझ्याकडून अपमान झाला आहे असे मी समजतो आणि याचे मला दुःख वाटते.
अशा प्रकारे कोणालाही दुखावण्याचे पाप शिरी घेऊन मला वरती जायची इच्छा नाही.
त्या एका वाक्यापेक्षा तात्यांचा स्नेह आणि सदिच्छा या माझ्यासाठी अधिक मोलाच्या होत्या, अजूनही आहेत.
म्हणून "संगीताचे सखोल ज्ञान" याविषयीचे ते संपूर्ण वाक्य मी वरील लेखातून गाळून टाकतो आहे.
प्रत्यक्ष असा बदल करणे शक्य नाही पण वाचकांनी तसे समजून घ्यावे ही विनंती.
तात्या, क्षमा करा मला. यापुढे प्रतिसाद द्या किंवा देऊ नका, सर्व तुमची मर्जी. मीही तुमच्याशी वाद घालणार नाही. लिखाण वाचलेत व असहमतीचा प्रतिसाद कोणत्याही शब्दात दिलात तरी त्याचा स्वीकार करेन, मी प्रतिप्रतिसाद देणार नाही.
दिगम्भा