भविष्यात सुलभ प्रसूतीसाठी मदत होते.
याबद्दल विशेष माहिती नाही. तसेच हे खेळ शरीर सुटू नये यासाठीही फायद्याचे आहेत.
उदाः
कोंबडा - चवड्यावर नाचणे - पायाच्या/मांडीच्या / पोटाच्या स्नायुंना व्यायाम होतो.
गाठोडे - पाय ज्या स्थितीत असतात त्याने पायाच्या स्नायुंना चांगला ताण बसतो. योगासनात गाठोड्याला बसतो त्याप्रमाणे बसून पाय जोराजोरात वर-खाली हलविल्याने पाठीला व्यायाम होतो तसेच ही क्रिया प्रजनेंद्रियांसाठी चांगली आहे असे ऐकल्याचे आठवते. पोट, कंबर सुटू नये यासाठी उपयुक्त
होडी - यामधे पाठीला चांगला बसतो. तसेच पोटावरही दाब आल्याने पोट सुटणे कमी होऊ शकते.
पिंगा - कंबरेला चांगला व्यायाम होतो. हा व्यायामही पोट, कंबर सुटू नये म्हणून उपयुक्त.
अजून खेळ डोळ्यासमोर येत नाहीत. पण या खेळांनी सर्वांगाला व्यायाम होतो हे मात्र खरे.