निद्रादेवीच्या राज्यात गुन्हा शाबीत झाल्यामुळे तडीपार होण्याची शिक्षा मिळालेले आम्ही फक्त तुम्हा सगळ्यांचा फक्त हेवा करू शकतो!
माझे 'मनोगत' वरचे बरेच लिखाण उत्तररात्री, भल्या पहाटे असे झालेले आहे. (म्हणजे एकाला न झोप येण्याचा किती जणांना ताप पहा!) एकदा माझ्या एका मित्राला मी सकाळी साडेचार वाजता मेल पाठवून मी तुला झोपेतनं उठवलं तर नाही ना असं विचारलं. तात्काळ त्याचं उत्तर आलं 'इन्सोम्नियाक्स ऍट वर्क!'.

लेख आवडला. वाचून झोप काही आली नाही. काय करावं? 'बसंतचं लग्न' चे भाग वाचायला घ्यावेत का? (ह. घ्या.)
ग्वांगज्झाउ  , हंगज्झाउ हे कुठे आहेत हो?