वांगीभात म्हणजे आपला वांगीभातच. मात्र त्याचा उच्चार ते वांगीबात असा करतात. ती भाजी नाही. भाजीला कूरा म्हणतात. गुत्तीवंकाय म्हणजे आपण भरली वांगी करायला वापरतो ती वांगी. वांग्याला वंकाय म्हणतात. त्यामुळे भाजीचे नाव वांगीभात असणे शक्य नाही. वांगीभात हा पदार्थ महाराष्ट्रातून आंध्रात गेल्याचे समजते, त्यामुळे त्या नावाचे तेलुगुकरण न होता मराठी नाव तसेच राहिले असावे.